Sunday, August 30, 2009

चर्चासत्र झाले ? आता काय़?

चर्चा झाली द्वेष, राग, समज-गैरसमज, कारणे मीमांसा, कमी जास्त देणे घेणे झाले आता पुढे काय?
मित्रहो, आपण आपल्या शैक्षणिक आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक चर्चासत्र, संमेलनं व शिबीरं पाहिली असतील अनुभवली असतील व प्रत्येक चर्चासत्रात उघड झालेल्या शंकांचे व काही चांगल्या गोष्टींचे आपण समर्थन ही केले असेल. या समर्थनीय गोष्टी आपण किती प्रमाणात आपल्या कृतीत उतरवतो हे आपले आपणच जाणो. समजा शेतकऱ्यांची आत्महत्या : कारणे व मीमांसा किंवा पत्रकारिता व तिचे वाढते व्यावसायीक स्वरूप, असे अनेक ज्वलंत विषय केंद्रस्थानी ठेवून लाखो रुपये खर्च केले जातात व फक्त चर्चासत्राचे आयोजन केले जाते परंतू या चर्चासत्राच्या समारोपानंतर आपल्या जवळ काय उरले आहे किंवा काय उरते याचा आपण कधी विचारच करीत नाही किंवा केला नसावा. ज्या चर्चेला कृतीची पार्श्वभूमी नसते ती चर्चा आंधळ्याच्या हाती कंदीलाप्रामानेच असते. मुद्दा हा आहे की रोगाचे निदान झाल्या नंतर त्वरीत त्यावर काहीतरी ईलाज व्हायला हवा नाहीतर त्याच्या परिणाम मृत्यू पेक्षा भयानक आणखी दुसरा काय होईल? नुसती कपडे घालूनच अब्रू वाचवता येत नाही तर त्यासाठी आपली वागणूक व चाल-चलनही त्या दर्जाचे असावे लागते. काही तज्ञ आम्हाला अजून हा आजारच कळला नाही असे म्हणतात तर काही त्यावर औषधोपचार सुरू करतात यात फसवणूक दोन्ही बाजूने रूग्नाचीच आहे. जरा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करता लोकशाही ही हुकूमशाहीच्या तुलनेत कमी कृतीशील असते(शंका) असे वाटायला लागते परंतु हुकूमशाहीत ही मरणच आहे (मनाप्रमाणे जगलो तर...). एकाच मार्गाचे दीशादर्शक जर अनेक व विविध असतील तर प्रवाश्यान्नी करावे तरी काय? म्हणॆ अनैतिक लैंगिक संबंधातून ’एड्स’ होतो परंतु लैंगिक संबंध न ठेवता ही ’एड्सची लागण होऊ शकते? ’शोले’ मधे ठाकूर बंदूक उचलत नाही कारण त्याला हात नव्हते...याचा अर्थ असा नव्हे की त्याला मरणाची भिती नाही.
चर्चा....चर्चा...आणि..नुसती चर्चा.... अरे गुलाब जामून म्हणून पोट भरत नाही..पोट भरण्यासाठी त्याला खावेच लागते, ही तर न खाता अंगुराला आंबट म्हणणाऱ्यांना कोल्ह्याप्रमानेच गत झाली आपली. जी सर्व तज्ञ मंडळी त्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बातमी व तिचे स्वरूप या बद्दल बोलत होती त्यात एकही गाल्टुंग व रूग बद्दल न बोलावा आश्चर्य आहे.!!!!!. त्या सभागृहात बोलणाऱ्यांना याबद्दल माहीत नसावे असे मी म्हणत नाही कदाचीत इतरांना ते कळणार नाही म्हणून ते बोलत नसावे. याचा अर्थ असा नाही की समोर बसून ऐकणारी मंडळी अगदीच...... असो, जर मी तिथे बोललो असतो चर्चासत्र झाले ? आता काय़? तर उत्तर मिळाले असते तुम्ही प्रत्यक्षात पत्रकारिता करत असतांना या सर्व गोष्टींचे भान ठेवा व या गैर प्रकारास आळा घाला हेच उत्तर मिळाले असते. अरे ज्यांनी दुसर्‍याच्या पाठीवर आपल्या पोळ्या भाजल्या ते आता आम्हाला म्हणतात की तुम्ही त्यांची मलमपट्टी करा आम्ही मात्र पोळ्या भाजणे सुरू ठेवू.
अरे ज्या क्षेत्रात मी प्रवेश करित आहे त्या क्षेत्राचा मला अभिमान आहे व राहीलही कारण ते माझं क्षेत्र आहे. पंरंतू त्याच क्षेत्रातील एक वरिष्ठ व्यक्ती ( श्री. अलोक भट्टाचार्य ) त्या क्षेत्राला बेजबाबदार व बे-ईमान म्हणते व त्यासाठी संपूर्ण देशाला बे-ईमान ठरवते कशासाठी तर फक्त दोन-चार टाळ्यांसाठी, पैसे देवून टाळ्या वाजवणारे नपुंसक कमी नाही या देशात त्यांना शरण जावं अश्यांनी...बे-ईमान देश के बे-ईमान पत्रकार म्हणे?
पत्रकारिता आपल्या मूळ मार्गावरून कशी भरकटत चालली आहे त्या साठी जबाबदार असलेले घटक पत्रकारितेचे व्यावसायीकरण, मालक-संपादक संबंध (वाद), आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्शकांसमोर खुले झालेले असंख्य विकल्प, त्यांची आवाड-निवड, बदललेली बौध्दीक व मानसिक अस्वस्था, बदलते युग, जागतिकीकरण, नफेखोरी, स्पर्धेत टिकून राहण्याची लालसा ई. अनेक सकारात्मक व नकारात्मक मुद्दे समोर आले. परंतू सकारात्मक मुद्यांना चालणा व गती मिळावी व नकारात्मक मुद्यांना आळा बसावा यासाठी काय?
मी अनेक चर्चासत्र ऐकली पाहीली त्यांच्या सारखेच एक चर्चासत्र ’आर. डी. नॅशनल कॉलेज, वांद्रे येथे आयोजीत करण्यात आले या चर्चासत्रात नेहमीप्रमाणॆ नुसती चर्चाच झाली. मी असे म्हणत नाही चर्चा करणॆ चुकीचे आहे परंतू चर्चेनंतर मात्र कृती असावी. जर कार्यक्रमाच्या शेवटी संबधीत समस्यांवर कृतीबध्द नियोजन करून काही अहवाल अथवा काही निर्देश जाहीर केले असते व ते आमालात यावे म्हणून त्याचा पाठपुरावा केला असता तर त्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे काही सार्थक झाले असते. लिहीण्याचे तात्पर्य एवढेच की चर्चा करत असतांना त्या चर्चेला कृतीची जोड असावी अथवा भुक्कड चर्चे साठी सरकारचा पैसा विनाकारण खर्च करण्यात न यावा जो तुमच्य माझ्या सारख्याच्या खिशातून जातो. आपला......

No comments:

Post a Comment